जळगावातील दोन बसच्या मध्ये दाबले गेल्याने एसटी अधिकाऱ्याचा मृत्यू

Jalgaon जळगाव

जळगाव >> नादुरुस्त बस मागे घेतांना एसटी अधिकाऱ्याला मागून रिव्हर्स येणाऱ्या बसचा अंदाज न आल्याने त्याचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. शहरातील एसटी वर्कशॉपमध्ये आज सकाळी अपघात घडला. वर्कशॉप चार्जमन म्हणून कार्यरत असणारे भीकन शंकर लिंडायत (वय ५७, एसटी कॉलनी) हे दुरूस्त झालेल्या एका एसटीच्या वाहकाला हात मागे करून दिशानिर्देश देत होते. यातच मागे एक बस उभी असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तर समोरच्या वाहकाने गाडी जोरात रिव्हर्स घेतल्याने त्यांना धक्का लागला. आणि ते दोन्ही बसच्या मध्ये दाबले गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, भीकन शंकर लिंडायत हे गेल्या दहा दिवसांपासून सुटीवर होते. आजच ते ड्युटीवर रूजू झाले असतांना त्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला. यंदा ३१ डिसेंबरला ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्येने एसटी कॉलनीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

जॉईन व्हा आमच्या फेसबुक पेजला.
Read Jalgaon

फॉलो करा आमच्या इंस्टाग्राम पेजला… Read Jalgaon News

Twitter Updates साठी फॉलो करा…ReadJalgaon

रिड जळगाव वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा.
readjalgaon@gmail.com

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन होण्याकरिता लिंक वर क्लिक करा.

रिड जळगाव न्यूज ८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *