जळगावात राष्ट्रवादीकडून हाथरस अत्याचार आणि राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध !

Politicalकट्टा कट्टा निषेध

जळगाव ::> उत्तरप्रदेशातील हाथरस या ठिकाणी तरुणीवर बलत्कार करून त्या करण्यात आली आणि कांग्रेस नेते राहुल गांधींना युपी पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला. तसेच योगी सरकार बरखास्त करावी, अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथील एका युवतीवर काही नराधमांनी अत्याचार केला. त्यात तिचा जिव गेला. त्यानंतर प्रशासनाने तिच्या परिवारास तिला भेटू दिले नाही. तिच्या पार्थीवाचे अंतिम दर्शन घेऊ दिले नाही, विधी करू दिला नाही. तसेच परिवारासह संपूर्ण गावाला बंदी बनवून ठेवत मध्यरात्रीनंतर पोलिसांनी तिचे पार्थीव दहन केले. पिडीतेच्या परिवारास भेटायला गावातील लोकांना बंदी घातली. एवढेच नव्हे तर पिडीतेच्या परिवारास भेटायला गेलेले कॉंग्रेस नेते खा.राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा व इतर खासदार, लोकप्रतीनिधींना, सामान्य जनतेला तेथील स्थानीक पोलिसांनी मारहाण व धक्काबुक्की केली. तसेच मिडियाला देखील गावात जाऊ दिले नाही. वरील बाबी ह्या गंभीर असून भारतात लोकशाही आहे की हुकूमशाही? असा प्रश्न निर्माण करणारी आहे.

देशातील बड्या नेत्यांना, खासदारांना, मिडीला जर पोलीस मारहाण करत असतील तर सामान्य जनतेचे काय होईल? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. तसेच वरील बाब पाहता तेथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. भाजपाने रामराज्य आणण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात तेथील सरकार पोलिसांमार्फत सामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. वरील सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो, व उत्तर प्रदेश सरकार बरखास्त व्हावे ही मागणी करतो, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *