जळगावात प्रेमप्रकरणातून तरूणाचा निघृण खून

Jalgaon क्राईम

जळगाव प्रतिनिधी >> येथील तांबापूरा परिसरातील गवळी वाड्यातील राम बाबा कुट्यातील रहिवासी ३५ वर्षीय तरूणाचा प्रेमसंबंधाच्या त्रिकोणातून काल रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास मेहरूण येथील स्मशानभूमीजवळ एका तरूणाने तिक्ष्ण हत्याराने निघृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, रात्रीच तासा भराच्या तपासात एमआयडीसी पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले. याबाबत माहिती अशी की, मयत अंकुश उर्फ बबलु नाना हटकर (वय ३०) हा आपल्या परिवारासह तांबापूरा परिसरात रामबाबा कुटीया येथे रहिवासाला आहे.

अंकुश हा ड्रायव्हर म्हणून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्या शेजारी सुभाष निंबा मिस्तरी हा सुध्दा रहिवासाला होता. गेल्या चार वर्षापासून सुभाष हा मेहरूण येथील रेणुका नगर येथे रहायला गेला होता.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे आरोपी सुभाष व अंकुश उर्फ बबलु या दोघांचे एकाच मुलीचे प्रेमसंबंध असल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार काल रात्री १० वाजेच्या सुमारास अंकुश उर्फ बबलु यास तांबापूरा परिसरात राहणार्‍या अजिज हमीद तडवी याने बबलु घरी आहे का? अशी विचारणा केली होती.

त्यानंतर काही वेळात बबलु व अजित हे दोघे एकाच मोटारसायकलवर डिमार्टकडे गेल्याचे फिर्यादी यांनी पाहिले होते. त्यांच्या पाठोपाठ सुभाष मिस्तरी हा देखील गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ११.३० वाजेच्या सुमारास अजिज हमीद तडवी याने बबलु याच्या घरी येत सांगितले की सुभाष मिस्तरी व बबलु याचे वाद झालेले आहे.

या वादात सुभाष याने तिक्ष्ण हत्याराने बबलु याच्यावर वार केले. या हल्ल्यात बबलु गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ नेत असतांना हॉटेल कस्तुरीजवळ तो बेशुध्द पडल्यामुळे त्यास काही लोकांच्या मदतीने रिक्षाने दवाखान्यात पाठविले असल्याचे त्याने सांगितले.

घटनेची माहिती मिळताच कुटूंबिय रुग्णालयात दाखल झाले असता. बबलु हा मयत झाला होता. याबाबत अरूणाबाई नाना हटकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात भादंवि ३०२ प्रमाणे सुभाष निंबा मिस्तरी याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि संदीप हजारे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *