जळगाव एमआयडीसी परिसरात मध्यरात्री अज्ञातांनी ट्रक पेटविला..!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> शहरातील एमआयडीसी परिसरातील अज्ञात आरोपींनी ममता बेकरी जवळ उभा असलेला ट्रक मध्यरात्री पेटविल्याने सुप्रीम कॉलनीत एकच खळबळ उडाली.

शहरातील एमआयडीसी भागातील सुप्रीम कॉलनीत असलेल्या ममता बेकरी जवळ उभा असलेला ट्रक अज्ञान आरोपींनी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पेटवून दिला होता. त्यामुळे परिसरात मोठे आगीचे लोळ दिसत होते.

मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एमआयडीसी पोलिसांना फोन वरून माहिती दिली. दरम्यान, हा ट्रक कुणाचा होता आणि कुणी पेटवून दिला याबाबत अधिक अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. परंतू मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अशा घटनेने परिसरात असुरक्षितता जाणवत आहे असे काही नागरिकांचे म्हणणे पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *