तब्बल 74 दिवसानंतर उघडणार जळगावातील दुकाने

Jalgaon जळगाव

जळगांव शहरातील सर्व दुकाने सम-विषम पद्धतीने होणार सुरू ; कोरोना पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन दुकानदार व ग्राहकांना करणे अनिवार्य

जळगाव प्रतिनिधी >>शहरातील दुकाने दि.५ जून पासून सम-विषम तत्त्वावर सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी याबाबत आज आदेश जारी केले आहेत.

शुक्रवारपासून (दि.५) सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातील दुकाने उघडता येणार आहेत. सर्व व्यावसायिक आस्थापनांचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. पी 1 या श्रेणीतील दुकाने विषम, तर पी 2 या श्रेणीतील दुकाने सम तारखांना उघडता येणार आहेत.

रस्ता पूर्व-पश्चिम असल्यास दक्षिण बाजूंकडील दुकाने सम तर उत्तर बाजूकडील दुकाने विषम तारखेला उघडतील. रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास पूर्व बाजूकडे दुकानासमोर पश्चिम बाजूकडील दुकाने विषय तारखेला उघडतील. बंद असलेल्या दुकानांसमोर ग्राहकांना त्यांची वाहने पार्क करता येणार आहेत.

सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार असून कोरोना पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन दुकानदार व ग्राहकांना करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

सोशल डिस्टन्स राहावे, याकरिता दुकानदारांना व्यवस्था करायची असून ग्राहकांनी त्यांचे मास्क लावण्याचीही जबाबदारी दुकानदारांवर आहे. कापड दुकानांत ट्रायल रूम वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

कपड्यांची अदलाबदल करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. थर्मल स्कॅनिंग, हॅंड वॉश व सॅनिटायझरची व्यवस्था दुकानदाराने करणे अनिवार्य आहे.

शहरातील ही दुकाने 5 जून ते 30 जूनपर्यंत सम-विषम पद्धतीने चालू राहणार आहेत. शहरातील प्रतिबंधित व बफर झोनसह दाट वसाहतीच्या ठिकाणच्या बाजारपेठा मात्र बंद राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *