माहेरातील शेजाऱ्यासोबत पळालेल्या दोन मुलांच्या आईला गुजरातमधून घेतले ताब्यात

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> तालुक्यातील एका गावातील दोन मुलांची आई असलेली महिला बेपत्ता झाल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केली असता ती महिला माहेरातील एका शेजाऱ्यासोबत पळून गेल्याचे आढळून आले. तिला गुजरात राज्यातून ताब्यात घेऊन पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ADS.

महिला १० जानेवारी रोजी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा शोध घेतला; मात्र, ती आढळून आली नाही. त्यामुळे नातेवाइकांनी तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली होती. ती महिला गुजरात राज्यातील वडोदरा येथे असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा वडोदरा येथे शोध घेतला. ती शेजारच्या व्यक्तीसोबत पळून आल्याचे आढळून आले. तिला धुळ्यात पालकांच्या स्वाधीन केले आहे.