जळगाव >> जिल्ह्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढवण्याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात यापूर्वी लॉकडाऊनचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेला होता. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेले आदेश लागू राहतील.
महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनचा कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत दिलेले निर्देशही लागू राहतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.