12 जानेवारी जळगाव जिल्हा कोरोना अपडेट्स वाचा थोडक्यात !

Jalgaon जळगाव जळगाव जिल्हा सिटी न्यूज

जळगाव जिल्ह्यात आज 688 कोरोना संशयितांचे स्वॅब घेतले. आज नव्याने 56 बाधित आढळले तर आज दिवसभरात 54 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 54593 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 499 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 56 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 56431 इतकी झाली. आतापर्यंत 1339 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जळगाव शहर – ४०, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ- ०१, अमळनेर- ०१, चोपडा-०३, पाचोरा-०२, भडगाव-००, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-०२, पारोळा-०४, चाळीसगाव-०२, मुक्ताईनगर-००, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ५७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ५६ हजार ४३१ पर्यंत पोहचली असून ५४ हजार ५९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत १३३९ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत. तर ४९९ रुग्ण सध्या उपचार घेताय.