मौलवीने महिलेला संमोहित करत अश्लील व्हिडीओ बनवून, दमदाटी देत धर्मपरिवर्तन करून केला निकाह; गुन्हा दाखल

Jalgaon क्राईम जळगाव जळगाव जिल्हा जामनेर

जामनेर प्रतिनिधी >> अश्लिल व्हिडीओ दाखवून धर्मांतर करून निकाह केला, अशी तक्रार एका महिलेने केल्याने नेरी परिसरात खळबळ उडाली. या महिलेच्या तक्रारीवरून पती विरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. संशयित पसार आहे.

अल्ताफ मेहमूद मणियार हा नेरी (ता.जामनेर) येथील मूळ रहिवासी तरूण सन २०१७ पासून मालेगाव येथे वास्तव्यास गेला आहे. तेथे एका विवाहित महिलेशी त्याचे सूत जुळले. यातूनच अल्ताफने आपला अश्लील व्हिडीओ काढला. धर्मांतर घडवून निकाह करण्यास भाग पाडले. त्यासोबतच आपल्याकडून साडेतीन लाख रूपये घेतल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणने आहे.

या महिलेने आधी जळगाव येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून जामनेर पोलिसांत पती विरूद्ध गुन्हा दाखल झाला. यातील आरोपी पसार झाला आहे.

दरम्यान, संबंधित महिला व अल्ताफ हे गेल्या तीन वर्षांपासून सोबत राहत होते. अल्ताफ हा तीन वर्षात फक्त सात-आठ दिवसच घरी आला होता. त्यावेळी महिला देखील त्याचेसोबत आली होती. त्याव्यतिरिक्त उभयतांचा नेरी गावाशी कुठलाही संबंध नाही. मात्र, महिलेने जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने हे प्रकरण नेरीशी जोडले गेले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.