जळगाव प्रतिनिधी >> बंदोबस्तासाठी पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाते. मात्र, दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील होमगार्डला मानधन मिळालेले नाही.
जिल्ह्यात सुमारे १६०० होमगार्ड सेवेत आहेत. कोरोना काळात त्यांनी पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्त केला आहे. त्यावेळी त्यांचे मानधन नियमित झाले होते. आता नोव्हेंबर महिन्यापासून होमगार्डला मानधन नाही. त्यातच ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्ड कर्मचाऱ्यांना आता नियमित ड्युटी दिली जात नसल्याची तक्रार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त वयाच्या होमगार्डला ड्युटी दिली जात नाही. परंतु, यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. या शिवाय दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याचीही तक्रारी वरिष्ठांकडे केली आहे.