आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Social कट्टा आत्महत्या कट्टा शेती

जळगाव >>घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता शासनाच्यावतीने अर्थसहाय्य मिळते. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, यासाठी कै. दिलीप गोविंदा पाटील, वडली, कै. मुकेश सुकलाल पाटील, कानळदा, कै. आबासाहेब अमृत काळे, कंडारी, कै. प्रकाश मानसिंग पाटील, गाढोदा यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासनाच्यावतीने धनादेशाचे वितरण करण्यात आले.

त्याचबरोबर नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या उभारी कार्यक्रमातर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटूबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच त्यांच्या कुटुंबाना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच शासन नेहमीच शेतक-यांच्या पाठीशी उभे असल्याचा विश्वास निर्माण करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत.