जळगाव शहरात जिमची दारे झाली खुली

Jalgaon जळगाव

जळगाव ::> शासनाने परवानगी दिल्याने ७ महिन्यापासून बंद जिमचे दार बुधवारी खुले झाले. पहिल्या दिवशी जीमचालकांनी शासकीय नियमाचे पालन करुन कसरती करण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश दिला जात चित्र सर्वत्र पाहण्यास मिळाले.

बुधवारी पहिलाच दिवस असला तरी सभासदांसह नवीन लोकांनीही चौकशी केली. कोरोनाची भीती घालवण्यासाठी प्रत्येक बँचनंतर जीम सॅनिटाइज, येणाऱ्याला सॅनिटाइज, थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत होती. येणाऱ्या दोन-तीन दिवसात अजून प्रतिसाद वाढेल, असे जीम चालक दीपक राजपूत यांनी सांगितले.