तापीच्या काठी गावठी दारूचा अड्डा उध्वस्त ; ६५ हजारांचा माल नष्ट!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी::> तापी नदीच्या किनारी बेकायदेशीर हातभट्टी, दारूचा अड्डा जळगाव तालुक्यातील भोलाने येथे उध्वस्त केला याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, तापी नदी किनारावर भोलाने येथून जवळच्या शिवारात अनधिकृत बेकादेशीर गावठी हातभट्टी सुरू आहे अशी माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि. रविकांत सोनवणे यांना मिळाली.

आज रविवारी सकाळी ५ ते ८ वाजेच्या दरम्यान चार ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. यामध्ये ६२ लोखंडी व प्लास्टीक ड्रम २०० लिटरचे ६ हजार २०० रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन असा एकुण ६२ हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्यानुसार पोहेकॉ बापू पाटील, दिपक कोळी, सुशील पाटील, सुधाकर शिंदे यांनी ही कामगिरी बजावली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *