शेतकऱ्यांची फसवणूक न होण्यासाठी तरतूद करावी

Jalgaon जळगाव

जळगाव ::> केंद्र सरकारने कृषी विषयक धोरणे मंजूर करुन अनेक बंधनात अडकलेल्या शेतकऱ्यांना मोकळे करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली अाहे. शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाबाबत आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी भारत कृषक समाजातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी करण्यात आली आहे.

नवीन विधेयकामुळे ग्रामीण भागात उद्योग, कोल्ड स्टोरेज, गोदामे उभे राहतील. त्यामुळे या विधेयकाचे स्वागत करावे, असे आवाहन कृषक समाजातर्फे करण्यात आले आहे. भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे, वसंतराव महाजन, प्रशांत चौधरी, जगतराव पाटील, रावसाहेब चिखलीकर, गोविंद रोकडे आदींनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *