जिल्ह्यात वीजबिलाची सक्तीने वसुली नको : भाजप

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव >> लॉकडाऊन संपत नाही तोच सक्तीच्या विजबिल वसुलीचे आदेश काढले आहेत. शेतकरी आणि घरगुती ग्राहकांसाठी ही चिंतेची बाब असल्याने महावितरणची सक्तीची वसुली न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे. सक्तीच्या विजबिल वसुलीविरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिले. त्यात सक्तीची बिल वसुली थांबवण्याची मागणी करण्यात आलेली आहे.