गुटख्याचा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याने पोलिसांना भोवले ; एपीआयसह सात कर्मचारी निलंबित

Jalgaon क्राईम जळगाव पाेलिस रिड जळगाव टीम

जळगाव प्रतिनिधी ::> चाळीसगाव तालुक्यात गुटखा वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर जप्त न करता जळगावात आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगले भोवले आहे. या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन पोलिस अधिक्षकांनी बुधवारी मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या एपीआयसह सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, पोलिस मुख्यालयातील नटवर जाधव व मेहुणबारे पोलिस ठाण्याचे रमेश पाटील यांचे पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबन केले असून तसे आदेश बुधवारी रात्री उशीरा काढण्यात आले आहे.

हे सर्व प्रकरण संशयित असल्यामुळे चाळीसगावचे अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे चौकशी सोपवण्यात आली होती. चव्हाण यांनी संबधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले होते. त्यानंतर बुधवारी एपीआय बेंद्रे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.