राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या जिल्हा बैठक

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव रिड जळगाव टीम

जळगाव >> राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक बुधवारी आयोजित केली आहे. दुपारी २ वाजता पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराती यांच्यासह पक्षाचे माजी आमदार, खासदार आाणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. माजी मंत्री खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर ही पहिलीच पक्ष बैठक आहे.