व्यापाऱ्यांना टोकन दिल्यास कारवाई; जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला इशारा

Jalgaon जळगाव रिड जळगाव टीम शेती

जळगाव >> किमान आधारभूत दराने करण्यात येत असलेली कापूस खरेदी पारदर्शीपणे पार पाडा. कापूस खरेदीचे टोकन देताना शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना टोकन दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सहकार, कापूस पणन महासंघ व सीसीआयच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात सीसीआय व कापूस पणन महांसघामार्फत १० तालुक्यांत एकूण ३४ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू असून आतापर्यंत सीसीआयच्या २१ केंद्रांवर ३६५४ शेतकऱ्यांचा २ लाख ४० हजार ९३९ क्विंटल कापूस खरेदी केला आहे, अशी माहिती उपनिबंधक बिडवई यांनी दिली.