जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस लावणार ताकद

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा निवडणूक

जळगाव >> ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्हाभरात निवडणुकीच्या राजकीय तयारीला वेग आला आहे. यासंर्दभात काँग्रेस पक्षाने सोमवारी पक्ष कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणुक लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

बैठकीला जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, जिल्हा प्रभारी प्रकाश मुगदीया, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव डी. जी. पाटील, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी जिल्हा अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, सुरेश पाटील, माजी शहर अध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, सुलोचना पाटील, अशोक खलाने, जमील शेख, अविनाश भालेराव, योगेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. हितेश पाटील, एनएसयुआयचे देवेंद्र मराठे, मुनावर खान, प्रतिभा मोरे, विकास वाघ, अँड.अमजद पठाण, सचिन सोमवंशी, शंकर पहेलवान, प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.