जळगावातील अक्सानगर दंगल प्रकरणी एका संशयितास अटक

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> मेहरूणमधील अक्सानगरात ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली हाेती. यात लोखंडी सळई व कुऱ्हाडीचा वापर झाला असून, दगडफेकही झाली हाेती. या घटनेत अनिस कुरेशी अब्दुल सत्तार कुरेशी याची आई हबीबाबी कुरेशी, पत्नी शगुफ्ता व भाचा कमरेन बिलाल अहमद, माजी नगरसेवक इक्बालोद्दीन पिरजादे हे पाच जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी दोन्ही गटांकडून देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार दंगल व प्राणघातक हल्ल्याचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी शेख जब्बार शेख गफूर कुरेशी (वय ४९, रा. अक्सानगर) या संशयितास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला सुरा, दगड जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *