जळगावातील तरुणास २७ हजारांचा ऑनलाइन गंडा

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या तरुणाच्या बँक खात्यातून मध्यरात्री ऑनलाइन व्यवहार करून २७ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रजत रतनलाल छाजेड (वय २६, रा. मायादेवीनगर) हे बंगळुरू येथील खासगी कंपनीत नोकरीस आहे. लॉकडाऊनच्या काळात ते घरून काम करत आहेत. त्यांचे विसनजीनगरातील बँक ऑफ बडोदा येथे खाते आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नेहमीप्रमाणे ते झोपले. सकाळी ६ वाजता उठल्यानंतर त्यांना मोबाइलवर दोन मेसेज आले. त्यात त्यांच्या बँक खात्यातून १३ हजार ७७७ रुपये ऑनलाइन डेबिट झाल्याचे कळले.

दोन वेळा करून एकूण २७ हजार ५५४ रुपये खात्यातून वर्ग झाले. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी कोणतेही ऑनलाइन व्यवहार केले नसल्याने पैसे कोणत्या कारणासाठी कापले गेले यांची चौकशी बँकेत जाऊन केली. या वेळी ई-कॉमर्ससाठी ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन झाल्याचे समजले. याप्रकरणी रजत यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव तक्रार केली. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *