पिस्तूलचा धाक दाखवून जळगावात दोघांनी घातला १५ लाखांचा दरोडा

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम चोरी, लंपास जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> दुचाकीवरुन पैसे घेऊन जाणाऱ्या प्रौढासह नागरिकांना पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीवरुन आलेल्या दोन दरोडेखोरांनी हवाल्याची १५ लाखांची रोकड लांबवली. यावेळी झटापट होताच नागरीकांच्या तावडीतून सुटण्यासाठी दरोडेखोरांना स्वत:ची दुचाकी सोडून पळुन जावे लागले.

सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शोभा हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. दरोडेखोर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाले आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी संशयितांची नावे, फोटो मिळवले आहेत.

एमआयडीसीतील प्रभा पॉलिमर्स कंपनीचे मालक विशाल लुंकड यांनी १५ लाख रुपये मंगळवारी बँकेत भरायचे असल्याने गणपतीनगरातील घरी पोहोचण्याची जबाबदारी भावसार व दुसरे कर्मचारी संजय सुधाकर विभांडीक (वय ५१, रा. महाबळ) या दोघांना सोपवली होती. त्यानुसार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भावसार व विभांडीक हे दोघे स्वतंत्र दुचाकींनी गणपतीनगरकडे निघाले होते. रोकड ठेवलेली बॅग भावसार यांच्या दुचाकीच्या हॅण्डलला अडकवली होती.

शोभा हॉस्पिटलसमोर येताच एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरील दोघांनी भावसार यांच्या दुचाकीवरील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करत दुचाकी वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यात भावसार, विभांडीक व दुचाकीवरील दोन्ही दरोडेखोर यांच्यात झटापट सुरू झाली.

या झटापटीत तिन्ही दुचाकी व चारही जण रस्त्यावर पडले. याचवेळी एका दरोडेखोराने कमरेत खोचलेले पिस्तुल काढून विभांडीक यांच्यावर रोखले. नागरिकांनी विरोध, आरडाओरड केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने देखील पिस्तुल रोखले होते. दीड मिनीटे ही झटापट सुरू होती. गोळीबार करण्याची भीती दाखवत त्याने विभांडीक यांच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून पलायन केले.