जळगाव प्रतिनिधी >> जिल्ह्यातील माजी खासदार माजी आमदार असलेले तालुक्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी हे आज कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य विभागाने प्रसिद्ध करून रुग्णाचे राजकीय पक्षाचे व पदाचा उल्लेख ( प्रसिद्धी )अनधिकृत रित्या प्रसिद्ध केल्याने आणि गोपनीयतेचा भंग केल्याने तसेच राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णाचे नांव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश काढलेले असताना. तसेच भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या पदाधिकाऱ्यांचा स्वॅब घेतल्याचे सुद्धा प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रावेर विधानसभा व लोकसभा मतदारसंघात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत असून एका जबाबदार लोकप्रतिनिधीचे पदाचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण शासकीय व आरोग्य यंत्रणेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोग्य विभागाकडून रुग्णास बदनामी करणे संदर्भातली माहिती अनधिकृतपणे व्हायरल झाल्याने आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.