कोरोनाचा प्रकोप ; जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ११०९ वर पोहचली

Jalgaon जळगाव

जळगाव >> जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ११०९ वर पोहचली असून आजपर्यंत ८४१२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी ६८०७ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ४१६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून आज पर्यंत कोरोनामुळे १२२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली. कोरोना बाधितांची एकत्रित संख्या तालुका निहाय पुढील प्रमाणे 8211; जळगाव शहर २३४, भुसावळ २३५, अमळनेर १६९, चोपडा ६०, पाचोरा ३५, भडगाव ८५, धरणगाव २८, यावल ५०, एरंडोल २३, जामनेर २६, जळगाव ग्रामीण २८, रावेर ८४, पारोळा २१, चाळीसगाव १७, मुक्ताईनगर नगर ९, बोदवड १ तसेच दुसऱ्या जिल्ह्यातील ४ असे एकूण ११०९ रुग्ण कोरोना बाधित आहेत. जिल्ह्यात सद्य स्थितीत ५३०रुग्ण कोरोना मुक्त झाले असून ४५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.त्यापैकी ३५ रुग्ण अत्यवस्थ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *