जळगाव >> जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढतच असून आज दुपारी प्रशासनाकडून मिळालेल्या अहवालानुसार पुन्हा 36 रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 945 इतकी झाली आहे. आज आलेल्या अहवालानुसार सावदा 11, रावेर 6, पाचोरा 7, चाळीसगाव 4, यावल 2, फैजपूर 4, एरंडोल 1, भडगाव 1, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 945 झाली असून आतापर्यंत 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 429 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तसेच 365 जणांवर उपचार सुरु आहेत.