Good News : जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 1057 रूग्ण कोरोनामुक्त ! वाचा तालुक्यानुसार कोरोना मुक्त झालेल्यांची सविस्तर बातमी !

Jalgaon जळगाव

जळगाव >> आज दिवसभरात 110 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय कोविड रूग्णालय घोषित केल्यानंतर आज तीन महिन्याची बालिका उपचारानंतर बरे होऊन घरी जाणारी पहिली कोरोनामुक्त ठरली. जळगाव जिल्ह्यात आज 110 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

वाचा तालुकानिहाय कोरोना मुक्त >> जळगाव शहर-225, जळगाव ग्रामीण-22, भुसावळ-176, अमळनेर-132, चोपडा-80, पाचोरा-28, भडगाव-78, धरणगाव-34, यावल-45, एरंडोल-31, जामनेर-37, रावेर-74, पारोळा-63, चाळीसगाव-16, मुकताईनगर-7, बोदवड-8, इतरजिल्हा-1 जळगाव जिल्ह्यात 1057 रूग्णांची कोरोनावर मात झाली असून सध्या उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होतील अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोशल मिडीयावर देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1057 रूग्णांनी कोरोनावर मात केली. आज 34 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले असून रूग्णांची संख्या 1885 इतकी झाली. त्यापैकी 677 रूग्णांवर सध्या उपचार सुरू असून 151 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *