जळगाव कोविड सेंटर मधील कोरोनामुक्त झालेल्या 22 रुग्णांची मुक्तता

Jalgaon जळगाव

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून अभिनंदन : रुग्ण बरे होऊन परतले आनंदात घरी

जळगाव >>येथील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या प्रांगणातील अल्पसंख्यांक वसतीगृहात असलेल्या कोविड कक्षातील 22 कोरोना रुग्ण संपूर्ण बरे झाल्याने आज सर्वांना खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत टाळ्या वाजवून निरोप देण्यात आला.

खासदार उन्मेश दादा यांनी साधला रुग्णांशी संवाद >>गेल्या एकवीस दिवसांपासून कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण आज बरे होऊन घरी परतणार असल्याने त्यांना आज खासदार उन्मेश दादा पाटील, आमदार स्मिताताई वाघ,महापौर भारतीताई सोनवणे यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. या रुग्णांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून उपचाराबद्दल माहिती घेतली आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 18, भोकर येथील 3 तर विटनेर येथील 1 रुग्णांचा समावेश होता.

या रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात >> ते म्हणाले आमची अतिशय चांगली व्यवस्था ठेवली गेली आणि वेळोवेळी औषधोपचार बाबत आमची काळजी घेतली गेली. तसेच महापौर भारती सोनवणे, माजी नगराध्यक्ष कैलास आप्पा सोनवणे यांनी दररोज फोन करून आमच्या जेवणाची चौकशी केली. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या रुग्णांनी संबंधित डॉकटर, नर्सेस, सफाई कामगार याचे देखील आभार मानीत आम्हाला भेटायला आल्याबद्दल खासदार उन्मेश दादा पाटील यांना धन्यवाद दिले.

अनेक रुग्णांच्या डोळ्यातून आनंदाश्रू >>यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रत्येकाची वैयक्तीक विचारपूस करीत परिवाराची चौकशी केली. यापैकी अनेक रुग्णांनी आपले अनुभव कथन केले तर निरोप देताना खासदारांसह उपस्थितीत मान्यवरांनी टाळ्या वाजवून या सर्वांना निरोप दिला यावेळी या रुग्णांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. याप्रसंगी रूग्णांच्या नातेवाईकांसह डॉ. नेहा भारंबे,डॉ. संजय पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. पल्लवी नारखेडे, हेमलता नेवे, डॉ. सायली पवार यांच्या सह कोविड केअर सेंटरचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *