मिलिंद फुलपाटील यांची यवतमाळ येथे नियुक्ती

प्रतिनिधी जळगाव >> शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार पुन्हा धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ही नियुक्ती होईल या खात्रीमुळे त्यांनी त्यांचे जळगावातील शासकीय निवासस्थान सोडले नव्हते. त्यामुळे आदेश प्राप्त होताच तासाभरातच त्यांनी पदभार घेत जिल्हा रुग्णालयात फेरी मारली आणि व्यवस्थेची पाहणी केली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभागाने २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. मिलिंद फुलपाटील यांची जळगाव शासकीय वैद्यकीय डॉ. रामानंद यांच्याकडे पुन्हा अधिष्ठाता पदाचा कार्यभारमहाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाच्या प्राध्यापकपदी नेमणूक करून अधिष्ठातापदी अतिरिक्त कार्यभार म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, शरीररचना शास्त्र विभागाचे पद रिक्त नाही असे डॉ. रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला दोन वेळा पत्राद्वारे कळवले होते.

त्यानंतरदेखील डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी १३ सप्टेंबर रोजी एकतर्फी पदभार घेतला होता. त्या वेळी डॉ. रामानंद यांनी पदभार त्यांना सोपवला असला तरी आपली पुन्हा या पदावर नियुक्ती होईल, अशी त्यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी अधिष्ठातांसाठीचे शासकीय निवासस्थान मात्र सोडले नव्हते.

पदभार स्वीकारताच कामकाज सुरू
डॉ. रामानंद यांनी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याकडून स्वीकारला. या वेळी उपअधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊराव नाखले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले उपस्थित होते. दरम्यान, डॉ. मिलिंद फुलपाटील यांची यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठातापदी नियुक्ती झाली. पदभार घेतल्यानंतर डॉ. रामानंद यांनी रुग्णालयाचा राउंड घेत रुग्ण, डॉक्टरांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *