पत्नीचे मित्रासोबत फोटो पाहिल्याने पतीचा पत्नीला गळा दाबून-जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

Jalgaon Jalgaon MIDC क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> मोबाइलमध्ये मित्रासोबतचे फोटो पाहून अभियंता असलेल्या पतीने गळा दाबून व उशीने तोंड दाबून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दिरानेही चारित्र्यावर संशय घेऊन लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा प्रकार महाबळमध्ये घडला. या प्रकरणी पती व दिराविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताना अटक करण्यात आली.

दरम्यान, ६ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. प्रकृती सुधारल्यानंतर शुक्रवारी त्या विवाहितेने रामानंदनगर पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली होती.