जळगावात विवाहितेची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी >> जळगाव शहरातील एका २५ वर्षीय विवाहितेने मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील आनंद श्रावण चौधरी, रा. पिंप्राळ हुडको हे पत्नी सुवर्णा आनंदा चौधरी, आई इंदूबाई चौधरी आणि दोन मुलांसह राहतात. आनंद चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि आई इंदूबाई होते. मध्यरात्री सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असतांना दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी इंदूबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.