जळगाव शहरातील गणेश कॉलनीतून घरातून ४ मोबाईल लांबविले ; पोलीसात तक्रार

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव >> गणेश कॉलनीतील अपार्टमेंटमधून ४ मोबाईल चोरल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

शहरातील गणेश कॉलनी भागातील ‘साल्ट फॅमिली स्पॉ’ नावाच्या ब्युटी पार्लस संबंधित दुकानावर असाम येथील चार तरूणी काम करतात.

गणेश कॉलनीतील गणगोपी अपार्टमेंट मधील प्लॅटमध्ये सायरीन क्लो (वय-२७), अर्चू खॅानाजाईन (वय-२०), तेन्झीन शिआंमी (वय-३०) आणि रोझ खाऊकिंप या चाही तरूणी राहतात.

नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास जेवण करून झोपल्या. आज पहाटे ७ वाजेच्या सुमारास त्यांनी दरवाजा उघडून पुन्हा झोपल्या होत्या.

७ ते ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खुशीखाली ठेवलेले तीन जणांचे २४ हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल लांबविले. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याच्या लक्षात आला.

त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. मोबाईल चोरीप्रकरणात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.