जळगाव शहर पोलिस ठाण्याजवळ दोन दुकाने चाेरट्यांनी फोडली

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील पानमसाला विक्रीची दोन दुकाने चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

शहर पोलिस ठाण्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुल आहे. व्यापारी संकुलात रवींद्र सुकलाल वाणी यांचे दुकान क्रमांक २९ विजय पान मंदिर नावाचे दुकान आहे. तर जवळच स्वच्छतागृहाच्या बाहेर रमेश सपकाळे यांची जय बजरंग नावाने पानटपरी आहे.

मंगळवारी रात्री ७ वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. चोरट्यांनी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून संधी साधली. चोरट्यांनी रवींद्र वाणी यांच्या दुकानातून ७०० रुपयांच्या सिगारेटची पाकिटे, २०० रुपयांची चिल्लर व एेवज लांबवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *