जळगावातील शिक्षा भोगत असलेल्या ‘चिंग्या’ चे विना परवानगी बॅनर लावल्याने गुन्हा दाखल!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याच्या वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छा फलक लावण्यात आले होते.

या प्रकरणात गुन्हेगारीचे उदात्तीकरण व समाजात आरोपीची दहशत निर्माण करण्यासाठी दोस्तीच्या दुनियेतील राजा, चिंग्या भाई असा फलक लावल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी (रा.तुकारामवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी आरोपी चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या (रा.तुकारामवाडी) याचा वाढदिवस आहे.

त्या निमित्त स्वातंत्र्य चौकातील मोहित कॉम्प्लेक्स व बेंडाळे चौकात त्याच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावला आहे. त्यावर शुभेच्छुकाचे नाव नव्हते. तरीही पोलिसांनी बॅनर बनवणाऱ्या राईट मीडिया ऍडव्हरटायझिंगचे मॅनेजर नदिम अख्तर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हे बॅनर मनोज चौधरी याने बनवल्याचे स्पष्ट झाले.

कोणत्याही शहरात कोणत्याही प्रकारचे बॅनर लावण्याबाबत संबंधित प्राधिकरणची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन मनोज चौधरीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *