जळगावातील बंडखोरी केलेल्या त्या २७ भाजपच्या नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी तब्बल ३० हजार पानांची याचिका!

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> भारतीय जनता पक्षाला जळगाव शहर मनपाच्या निवडणुकीत नामुष्की पत्करावी लागली राज्यातील नगरसेवकाची ही मोठी फूट ठरली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आ.गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता.

जळगाव मनपाच्या महापौर निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल केली आहे. भाजपने दाखल केलेली ही याचिका राज्यातील मनपाच्या इतिहासातील ही पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे २७ नगरसेवक जळगाव मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फुटले होते. भाजपनं फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.

जळगाव मनपाच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली.

जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान,असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.