जळगाव शहरातून एकाची मोटारसायकल चोरीला !

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::>कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळून एका तरूणाची मोटारसायकल ५ सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिफ सलीम बागवान (वय-२९, रा. रामनगर शिरसोली नाका) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. ५ सप्टेंबर रोजी ते नेहमी प्रमाणे सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी आपली मोटार सायकल क्र. (एमएच १९ सीबी ०५८७) ने कृषी उत्पन्न बाजारसमितीत आले होते. त्यांनी आपली मोटार सायकल बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ लावली होती.

भाजीपाला खरेदी झाल्यानंतर गेटवर परतल्यावर त्यांना आपली मिळून आली नाही. त्यांनी मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला. आपली मोटार सायकल चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी आज बुधवारी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदिप पाटील करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *