भुसावळ प्रतिनिधी गिरीश पवार : > भुसावळ शहरात पुन्हा सहा रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील तळवेल येथील एका रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील रुग्णांची संख्या 93 झाली आहे. तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या अकरा झाली आहे. वरणगाव येथे सहा, खडका येथे चार व पुन्हा तळवेल येथे एक रुग्ण सापडल्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना शिरगाव करीत असल्याचे दिसून येत आहे. तरी नागरिक बंधू-भगिनींनो कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, घरात थांबणे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे शासनाचे आदेश व आवाहन तंतोतंत पाळावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे कोरोना विषाणू संसर्ग अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील तीन व्यक्तीचा समावेश.
भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत.
जळगाव ग्रामीण मध्ये कोरोनाची सुरुवात
एक महत्वाची सूचना विटनेर येथे पुरुष 58 स्त्री 48 असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत!
जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 450 झाली आहे.