भोकरला प्रशासक येत नसल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रिकाम्या प्रशासकाच्या खुर्चीला घातला पुष्पहार

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील भोकर येथे प्रशासकांच्या नियुक्तीला ३४ दिवस होऊनही प्रशासक येत नसल्याने तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीतील प्रशासकाच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले. भोकर हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे.

ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर येथे प्रशासकाची नियुक्ती केली आहे. मात्र ३४ दिवसानंतरही प्रशासक गावात येत नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. यासह स्वच्छता, पथदिव्यांसह पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

ग्रामसेवकही गावात येत नसून बाहेर थांबून काम पाहतात. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली प्रशासक, ग्रामसेवकांच्या खुर्चीला हार घातला. ग्रामसेवक, प्रशासकांनी कामकाज करून समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी आंदोलनाचाही इशारा काँग्रेस तालुका संघटक सचिव प्रा. भाऊसाहेब सोनवणे, चेतन सोनवणे, एकनाथ सैंदाणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे.