जळगावात प्राणघातक हल्ला प्रकरणी १४ जणांना कारागृहात रवानगी

क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी :>>कोंबड्या हुसकावल्याचा राग आल्यामुळे चुलत भावासह त्याच्या कुटुबियांनी तिघांवर लोखंडी रॉड, मटन कापण्याच्या सुऱ्याने वार करून जखमी केल्या प्रकरणातील संशयितांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

शनिपेठेतील रिधुरवाडा येथे २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता हा हल्ला केला होता. यात अक्तर रशीद खाटीक वय ४६ हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून १४ जणांविरुध्द शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात पोलिसांनी जाकीर हनीफ खाटीक, कय्युम हनीफ खाटीक सह १४ जणांना अटक केली होती. न्यायालयात हजर केले असता सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *