जळगाव > भरधाव गॅस टँकर व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास महामार्गावरील शिव कॉलनीनजीकच्या पुलावर घडली.
दरम्यान, अपघातानंतर अर्धा ते पाऊण तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी वाहतूक पोलिसांनी मालवाहतूक रिक्षात मृतदेह जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केला. मयताचे नाव समजू शकले नाही. मोटारसायकलस्वार हा शिवकॉलनीकडून खोटनगरकडे जात होता.
तर गॅस टँकर पुढे जात होता. त्या वेळी मोटारसायकलस्वार टँकरच्या मागच्या चाकात आला. त्यात तो मोटारसायकलसह फेकला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे पुलावरच हा अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. जमलेल्या काही लोकांनी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला पण ती अर्धातास उपलब्ध झाली नाही. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.