जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा : अभाविप

रिड जळगाव टीम

जळगाव प्रतिनिधी >> विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करुन येत्या परीक्षेसाठी अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेने केली आहे. याबाबत प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.

अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलसचिव व परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक यांची भेट घेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. परिषदेचे महानगर सहमंत्री कल्पेश पाटील, नगर मंत्री आदित्य नायर, संकेत सोनवणे, आकाश पाटील, योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, चर्चेअंती विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू असे आश्वासन मिळाले.

काय आहेत मागण्या >>
कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे व्यवसाय ४ महिने पूर्णपणे ठप्प होते.

विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे. त्यामुळे या सत्राची परीक्षा फी माफ करावी, अभियांत्रिकी अभ्यासक्रम २०१२-२०१३ सीजीपीए ८०-२० पॅटर्न बॅक लॉकची आयएसई परीक्षा घेण्यात यावी.

२०१९ आणि २०२० साली पदवी आणि पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी मुदत वाढवून द्यावी, परीक्षा होत असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकांची गरज आहे.

त्यामुळे विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालयातील अभ्यासिका व ग्रंथालय सुरू करण्यात यावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.