जळगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर वर्षअखेर निरोप व नूतन वर्षारंभाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सूचना जाहीर केल्या आहेत. सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्क्यांच्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली.

रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू आहे. अर्थात, एकत्र न येता नवीन वर्षाचे स्वागत करा. ३१ डिसेंबर च्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.

फिजिकल डिस्टन्सिंगकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागतच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *