महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीत व्हीप नाकारल्याप्रकरणी भाजपच्या २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी अपील दाखल केले आहे. याप्रकरणी साक्षीदारांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी ११ जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपत दोन गट पडले होते. एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर भाजपच्या हातून सत्ता निसटली होती. दरम्यान, बंडखो]र गटाने पक्षाचा गटनेता बदलून अॅड. दिलीप पोकळे यांना गटनेता केला होता. यादरम्यान महापालिकेत प्रभाग समिती सभापतींची निवड करण्यात आली. त्यात अॅड. पोकळे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून आालेल्या ५७ नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी व्हीप नाकारल्यामुळे अॅड. पोकळे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करत २७ नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणात दोन वेळा सुनावणी झाली आहे. तसेच आता साक्षीदारांची नावे कळवण्याची सूचना करण्यात आली आहे. भाजपच्या २७ नगरसेवकांनी सभापती निवडणुकीत निर्देशांचे उल्लंघन केले होते की नाही तसेच नगरसेवक म्हणून राहण्यास अनर्ह ठरतात किंवा कसे याबाबत चौकशी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *