IPL 2020 Time Table News IPL 2020 चे वेळापत्रक पहा !

स्पोर्ट्स

मुंबई ::> IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत 19 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता) सुरू होईल. (IPL 2020 Matches Full Schedule Fixtures IPL Timetable Venue List)

शनिवारी टूर्नामेंट सुरु झाल्यानंतर रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना होईल. हा दुबईतील पहिलाच सामना असेल. तर तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.

ज्या शनिवार-रविवार एकाच दिवशी दोन सामने असतील, तेव्हा आधीचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता) सुरु होईल. तर दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता (यूएईतील स्थानिक वेळेनुसार 6:00 वाजता) सुरु होईल.

आयपीएलमधील आठ संघात प्राथमिक फेरीत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. त्यापैकी 24 सामने दुबईत, 20 अबुधाबीत, तर 12 शारजा येथे होतील.

19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा13 वा हंगाम रंगणार आहे. एकूण 51 दिवस यूएईमध्ये क्रिकेटचा उत्सव साजरा होईल. सहा वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. याआधी लोकसभा निवडणुकांमुळे 2014 मध्ये आयपीएलच्या सातव्या हंगामाचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल हंगाम यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्च ते 24 मे दरम्यान खेळवला जाणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. (IPL 2020 Matches Full Schedule Fixtures IPL Timetable Venue List)

🚨🚨 #Dream11IPL 2020 Schedule Announced

Defending champions @mipaltan will take on three-time champions, @ChennaiIPL in the season opener on September 19.

For fixtures and more details, click here – https://t.co/o6CeOjbJeI pic.twitter.com/c4iUzZbQq9

— IndianPremierLeague (@IPL) September 6, 2020

1
1
3
4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *