शेतीच्या वाटे हिश्श्यावरून शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीने मारहाण

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> तालुक्यातील आर्वी गावात शेतीच्या वाटेहिश्श्यावरून शेतकऱ्याला शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीने मारण्यात आले. याप्रकरणी चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्वी येथील शेतकरी शिवाजी नथ्थू पाटील यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या जमिनीवर त्यांनी शेती करू नये, या कारणावरून रमेश पाटील, संगीता रमेश पाटील, सिंधुबाई पाटील, सुभाष लखा पाटील यांनी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.