भीषण पाणी टंचाई : इच्छापूर येथील गुरेढोरांची पाण्यासाठी भटकंती

मुक्ताईनगर

कैलास कोळी प्रतिनिधी मुक्ताईनगर >> येथून जवळच असलेले इच्छापुर या गावांमध्ये शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्याकडे गाई म्हशी बैल बकऱ्या असे पशुपालन प्राणी आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून गावामध्ये लोकवर्गणीतून पाण्याचा होत बांधण्यात आलेला आहे परंतु त्या हौदामध्ये ग्रामपंचायतीने कनेक्शन दिलेले आहे परंतु त्या हौदामध्ये गेले चार पाच दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही मुर्ग नक्षत्र सुरू झाले असून सुद्धा उष्णतेचे प्रमाण कमी झालेले नाही.

त्यामुळे दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ यावेळेला गुरेढोरे त्याठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात परंतु त्यामध्ये पाणी नसल्यामुळे मुक्या प्राण्यांची निराशा होत आहे मनुष्य कुठून पाणी आणू शकतो आणि पिऊ शकतो परंतु मुक्या प्राण्याचे काय या पशुपालन प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार नाही का? यांच्यापासून मानवजातीला या प्राण्यांपासून उपयोग नाही का? ग्रामपंचायतीला सार्वजनिक हौद बांधण्यासाठी नियम नाहीत का? ग्रामपंचायतीचे कर्तव्य नाही का? असे अनेक प्रश्न पशूपालन शेतकरी वर्गामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे.

हल्ली शेतीचे काम सुरू असताना दिवसभर बैलांच्या माध्यमातून शेतीमध्ये काम करत असतात परंतु शेतातून आल्यानंतर हौदा मध्ये पाण्याचा थेंबही नसतो आणि जंगलात गेले गाई म्हशी बकऱ्या ह्या सुद्धा संध्याकाळी व सकाळी येऊन त्यांना पाणी मिळत नाही हा त्यांच्यावर अन्याय नाही का? याला जबाबदार कोण? एका दृष्टीने आपल्या देशामध्ये व हिंदू राष्ट्रांमध्ये गाईला देवीचे स्थान दिलेले आहे आणि त्याच देशात व इच्छापुर गावात त्यांना पाणी मिळत नाही याला काय म्हणायचे गाईपासून मिळणारे दूध हे ब-याच मुला बाळांचे प्राण वाचवले आहेत.

आणि शेतामध्ये शेन खताच्या माध्यमातून शेतीमध्ये उत्पन्न वाढण्याचे काम या गाईन केलेले आहे बैलान पासून शेतीपेरण्याचे काम व बरेच काम बैलाण पासून केले जात आहे एवढे फायदे असतानासुद्धा गावामध्ये त्यांना पाणी मिळत नाही ही शोकांतिका नाही का? विशेष महिला वर्गाकडून या हौदा मध्ये लवकरात लवकर ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन त्याच्यामध्ये पाणी टाकावे आणि मुक्या प्राण्यांचा आशीर्वाद त्यांनी घ्यावा अशी अपेक्षा महिलां वर्गाकडून होत आहे कारण महिलेले च गाईचे महत्व जास्तीचे माहित आहे कारण बाळात पणा मध्ये एखादी महिला दगावल्यास त्या बाळाला गाईच्या दुधाने बाळ जिवंत राहिलेलाआहे, गाईने आई ची भूमिका पार पडली त्यांना पूर्ण माहिती आहे म्हणून त्यांना ती जान आहे ग्रामपंचायतीने ताबडतोब हौदामध्ये पाणी टाकावे अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *