जळगाव ::> महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत प्रचंड रोष निर्माण होत आहे. निवडणुकीला दोन वर्षे उलटूनही कोणत्याही समस्या सुटलेल्या नाहीत. जी कामे सुरू होती ती देखील बंद पडल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीपाठोपाठ आता काँग्रेसनेदेखील महापालिका बरखास्त करून आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू घोडेस्वार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मनपात सत्ता येऊन २ वर्षे उलटले तरी अजूनही भाजपकडून मूलभूत समस्या सोडवण्यात आल्या नाहीत. जनतेनेही विश्वास दाखवत बहुमत दिले; परंतु सुरू असलेली विकास कामेदेखील बंद पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
