जळगाव‎ >> घरगुती साहित्य घेण्यास माहेरावरुन‎ २ लाख रुपये आणण्याच्या‎ मागणीसाठी महिलेचा छळ‎ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या‎ नऊ जणांविरुद्ध शहर पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला.‎

 

निशात परवीन मोहंमद अशफाक‎ (रा. गेंदालाल मील, जळगाव) या‎ महिलेने शहर पोलिस ठाण्यात‎ फिर्याद दिली. घरगुती साहित्य‎ घेण्यासाठी माहेरावरुन २ लाख रुपये‎ आणण्याची मागणी केली.

 

आर्थिक‎ परिस्थिती चांगली नसल्याने पैसे‎ नसल्याचे सांगितले. त्यानंतरही‎ सासू व दीराच्या सांगण्यावरुन पतीने‎ चापटा, बुक्क्यांनी मारहाण करुन‎ शिविगाळ केली.‎

 

या प्रकरणी पती अशफाक मोहंमद‎ लालू, सासू जहारा मोहम्मद‎ लालू,सासरे आजम नूरा पहलवान,‎ नंदोई गुड्डी, दीर हनिफ जब्बार,‎ कमरुद्दीन, फरजाना सादिक (रा.‎ बऱ्हाणपूर), अलीम अख्तर (रा.‎ उज्जैन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *