शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या धरणगाव येथील धनश्री पाटील चा सन्मान

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा धरणगाव

धरणगाव प्रतिनिधी ::> खान्देशस्तरीय बाल वक्ता स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून उत्तेजनार्थ बक्षीस पटकावणाऱ्या धनश्री कांतीलाल पाटील हिचा कुटुंबीयांसोबत धरणगाव येथील बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने महा-नायिकांचे जीवनचरित्र व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त “शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे जीवन चरित्र तिला भेट दिले. तर पी. आर. हायस्कूलमधून नुकतेच सेवापूर्ती झालेले मुख्याध्यापक अमृतकर यांचा राष्ट्रमाता हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. पी. आर. हायस्कूलचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना प्रा. गौतम निकम लिखित “बहुजनांचे महानायक कांशीराम साहेब’ यांचे जीवन चरित्र भेट देण्यात आले.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक राजेंद्र वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उपाध्यक्ष हेमंत माळी, किशोर पवार, महासचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य महासचिव मोहन शिंदे, दीपक बिवाल, माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष नीलेश पवार, समर्पण ग्रुपचे अध्यक्ष महेंद्र तायडे, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, तालुकाध्यक्ष बाळू चौधरी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन, मयूर भामरे यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.