रावेर-बोरखेडा येथे गृहमंत्री अनिल देशमुख आज दुपारी घेणार पिडीत कुटुंबाची भेट

Politicalकट्टा कट्टा रावेर

रावेर प्रतिनिधी ::> महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आज जिल्ह्यात येत असून ते बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची दुपारी साडे तीन नंतर भेट घेणार असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

बोरखेडा येथील हत्याकांडांने प्रचंड खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते शनिवारी जिल्ह्यात येत आहेत. ते बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल रात्री दिली होती.

या अनुषंगाने आज सकाळी स्थानिक महसूल प्रशासनाला गृंहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा प्राप्त झाला आहे. दरम्यान, या दौर्‍याला तहसीलदारांनी दुजोरा दिला आहे. यानुसार ना. देशमुख हे १.३० वाजता जळगावला विमानाने येणार असून ते दुपारी साडे तीन वाजता बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची भेट घेणार आहेत. याप्रसंगी ते अधिकार्‍यांशी चर्चा देखील करणार आहेत. यामुळे आता गृहमंत्र्यांच्या दौर्‍याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.