हॉकी महाराष्ट्र सचिवाचा भ्रष्ट कारभार; केंद्रिय संस्था हॉकी इंडियाला घातला लाखोंचा गंडा

पुणे महाराष्ट्र स्पोर्ट्स

रिड जळगाव पुणे प्रतिनिधी ::> केंद्रिय संस्था, “हॉकी इंडियाची” फसवणुक करत खोटी माहिती पुरवून पुण्यातील, “हॉकी महाराष्ट्र” या संस्थेच्या सचिवाने लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मनोज भोरे असे फसवणुक करणाऱ्या हॉकी महाराष्ट्राच्या सचिवाचे नाव आहे. मुळात भोरे हे हॉकी खेळाडूच नाहीत. मात्र एका बड्या भ्रष्ट राजकीय नेत्याचे ते माझी सचिव असल्याने त्यांना हॉकी महाराष्ट्राचे सचिव पद बहाल करण्यात आले होते. या पदाचा दुरउपयोग करुन भोरे यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार करत केंद्रिय संस्था हॉकी इंडियाला लाखोंचा गंडा घातल्याची माहिती भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ऑल इंडिया गोल्ड कप हॉकी स्पोर्टस असोसिएशन, पुणे चे सचिव रमेश मकासरे यांनी दिली आहे.

याबाबत पुराव्यांसह माहिती त्यांनी हॉकी इंडियाचे अध्यक्ष/सचिव तथा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली आहे. या पत्रव्यवहारात ते म्हणतात कि, मनोज भोरे यांनी त्यांच्या पदाचा दुरउपयोग करुन आलीबाग येथे, “हॉकी महाराष्ट्र” नावाची संस्था सुरु केली. त्या संस्थेव्दारे विविध ठिकाणी स्पार्धांचे आयोजन केल्याचा खोटा कांगावा केला. मात्र आलीबाग येथे एकाही स्पर्धेचे आयोजन केले नाही. तसेच दुसऱ्या हॉकी संघटनांनी स्पर्धा आयोजित केल्यास तेथे खेळण्यासाठी जाणाऱ्या संघातील खेळाडुंना ससपेंड करीन, राष्ट्रीय संघात निवड होऊ देणार नाही अशा धमक्या दिल्याचे मकासरे यांचे म्हणने आहे.

२०१८-१९ आणि २०१९-२० दरम्यान हॉकी इंडिया, पुणे मनपा, जिल्हा परिषद, सकाळ वृत्तसंस्था अशा विविध संस्थांमार्फत एकूण ५८ हॉकी स्पर्धाचे आयोजन हॉकी महाराष्ट्रा मार्फत मनोज भोरे यांनी केले, अशी खोटी माहिती www.hockeymaharashtra.org या हॉकी महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशीत केली. तसेच सुरेंद्र आनंद लिग हॉकी स्पर्धा ही ९ महिने सुरु ठेवली मात्र त्याची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी घेतलीच नाही. तसेच हेगडेवार चष्क, आंबेडकर चष्क आणि आयडीसी (पोलीस क्रिडा स्पर्धा) घेतल्याची खोटी माहिती त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रकाशीत केली.

मुळात या ५८ स्पर्धांचे आयोजन करण्यामध्ये मनोज भोरे यांचा कसलाही वाटा नसून स्पर्धेसाठी फक्त पंच पुरवून त्यांचा मोबदला घेणे एवढाच होता. पण त्यांनी संपुर्ण ५८ स्पर्धांचे आपणच आयोजन केल्याची खोटी माहिती संकेतस्‌थळावर प्रकाशीत करुन हॉकी इंडियाची सर्रास फसवणूक केली.

भोरे हे हॉकी महाराष्ट्र या संस्थेचे सचिव झाल्यापासून पुरता मनमानी कारभार सुरु आहे. त्यांनी आजतोपर्यंत स्थानिक पातळीवरचा एकही खेळाडून तयार केला नाही. किंवा त्यांना वाव मिळेल असे कामही केले नाही. यामुळे त्यांच्या कार्यकारदीत एकही खेळाडू ऑलंपीयन झाला नाही. हे दुर्देवी आहे. या उलट त्यांनी हॉकी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपलेच खीशे कसे भरतील याकडे जास्त लक्ष ठेवल्याचा आरोप देखील मकासरे यांनी केला आहे.

या प्रकरणातील खोटारडे पणाचा कळस म्हणजे ज्या स्पर्धा कोविड १९ मुळे रद्द करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले होते त्या देखील आयोजित करुन घेतल्याचा दावा भोरे यांनी केला आहे. ज्यामुळे हॉकी इंडियाची लाखोंची फसवणुक झाली. यामुळे त्यांच्यावर त्वरीत कडक कारवाई करत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस असोसिएशनचे सचिव आर.बी. मकासरे यांनी पत्राव्दारे हॉकी इंडियाचे अध्यक्ष, सचिव आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. यामुळे आता भोरे यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
आर.बी. मकासरे – ९९२३९०८२०२